गाजर हलवा – हे नाव जरी कानावर आलं तरी लगेच तोंडाला पाणी सुटतं!
थंडीत खास बनवला जाणारा हा पारंपरिक, गोडसर आणि चविष्ट पदार्थ घरच्या घरी बनवा – तोही S.R. Thorat Dairy च्या शुद्ध आणि ताज्या Activ Cow Milk च्या सहाय्याने!
लागणारे साहित्य:
½ लिटर S.R. Thorat Activ Cow Milk
२ कप किसलेले ताजे गाजर
४ टेबलस्पून Gagangiri Milk Powder
½ टीस्पून इलायची पावडर
½ कप साखर (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
१ टेबलस्पून तूप (घी)
थोडेसे काजू व बदाम (तुकडे करून)
कृती:
दूध उकळा:
एका खोलगट भांड्यात अर्धा लिटर Activ Cow Milk मध्यम आचेवर उकळा.
गाजर घाला:
उकळलेल्या दुधात किसलेले गाजर घालून नीट मिक्स करा. हे मिश्रण थोडं वेळ मध्यम आचेवर शिजू द्या, जेणेकरून गाजर मऊसर होईल.
मिल्क पावडर आणि साखर:
त्यानंतर त्यात Gagangiri Milk Powder, साखर आणि इलायची पावडर घालून मिक्स करा.
साखर पूर्ण वितळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहा.
ड्रायफ्रूट्स आणि तडका:
आता त्यात काजू-बदामाचे तुकडे घालून एकदा ढवळा.
एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून ते गाजर हलव्यावर तडका म्हणून ओता.
तयार आहे स्वादिष्ट हलवा!
आता तुमचा गोडसर, मऊ आणि खवखवीत गाजराचा हलवा तयार आहे!
का निवडावे S.R. Thorat Dairy चं Activ Cow Milk?
100% शुद्धता व सातत्यपूर्ण गुणवत्ता
नैसर्गिक गोडसर चव
हेल्दी फॅट आणि प्रोटीनचे उत्तम प्रमाण
कोणतेही प्रिझर्वेटिव्ह्स नसलेले
S.R. Thorat Dairy – तुमचं आरोग्य, आमचं वचन!
गुणवत्तेची आणि स्वादाची खात्री – दर घासात अनुभवायला मिळेल!
Youtube Link:https://youtube.com/shorts/UOW3DsTe6sQ?si=vATt94kzy_OF_Ez8
Instagram:https://www.instagram.com/reel/DId6BbyP3jh/?utm_source=ig_web_copy_link