गोडसर आणि मऊसूत मिल्क ब्रेड – S.R. Thorat च्या Active Cow Milk सोबत!

मुलांना आणि मोठ्यांना सारखीच हवी असते ती म्हणजे – गोडसर, नरम आणि चविष्ट मिल्क ब्रेड!

सकाळच्या न्याहारीला किंवा दुपारच्या टिफिनला अगदी परफेक्ट पर्याय – आणि तीही अगदी झटपट बनणारी!

 

आज आपण बनवणार आहोत ही खास रेसिपी –

S.R. Thorat Milk Dairy च्या शुद्ध Active Cow Milk वापरून.

 

लागणारे साहित्य:

अर्धा लिटर S.R. Thorat Active Cow Milk

४-६ स्लाइस पाव / ब्रेड

१ टेबलस्पून बटर

१ टेबलस्पून कस्टर्ड पावडर

१ टेबलस्पून पावडर साखर

आवडीनुसार ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, मनुका इ.)

 

कृती:

दूध उकळवणे:

एका पॅनमध्ये S.R. Thorat चं Active Cow Milk घेऊन ते उकळून घ्या.

 

ब्रेड रोस्ट करणे:

दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करून ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करून घ्या.

 

कस्टर्ड मिक्स तयार करणे:

एका बाउलमध्ये थोडंसं दूध आणि कस्टर्ड पावडर एकत्र करून स्लरी तयार करा.

ही स्लरी आणि साखर उकळलेल्या दूधात मिसळा. सतत ढवळत राहा, गाठी होऊ नयेत म्हणून.

 

ब्रेड डिप करणे:

रोस्टेड ब्रेड स्लाइस या तयार गरम दुधात हळूहळू डिप करून दुधाचा स्वाद त्यात मुरू द्या.

 

गार्निश आणि सर्व्हिंग:

शेवटी वरून ड्रायफ्रूट्स घालून साजेसं गार्निश करा.

 

S.R. Thorat Milk का वापरावे?

Active Cow Milk – 100% शुद्ध आणि न्यूट्रिशन भरलेलं

मुलांच्या आरोग्यासाठी योग्य, आणि प्रत्येक पदार्थात चव वाढवणारं

दररोजचा विश्वास – SR Thorat Milk Dairy

 

Youtube Link:https://youtube.com/shorts/847IgkxLYHU?si=_jFWjRE0zx67CEel

Instagram:https://www.instagram.com/reel/DIEU46Tqek6/?utm_source=ig_web_copy_link

Share:

More Posts

चवदार शेवई खीर असेल, तर काय म्हणायचं? आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी शेवई खीर

चवदार शेवई खीर असेल, तर काय म्हणायचं? आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी शेवई खीर – ती ही एस. आर. थोरात

थंडगार, गोडसर आणि आरोग्यदायी चिकू मिल्कशेक तयार करा अगदी घरच्या घरी!

थंडगार, गोडसर आणि आरोग्यदायी चिकू मिल्कशेक तयार करा अगदी घरच्या घरी! साध्या आणि झटपट पद्धतीने बनवा हा खास S.R.Thorat Active Cow Milk वापरलेला हेल्दी ड्रिंक

Send Us A Message