आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, क्रीमी आणि झटपट होणारी रेस्टॉरंट-स्टाईल पनीर लवाबदार –

जी खास SR Thorat Dairy च्या गगनगिरी मलाई पनीर वापरून तयार केली आहे!

 

साहित्य:

 

२ टेबलस्पून तेल

१ मध्यम कांदा (चिरलेला)

२ हिरव्या मिरच्या

८-१० कढीपत्ता

थोडीशी कोथिंबीर

१ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट

२ टोमॅटो

१ टेबलस्पून मगज बी (melon seeds)

७-८ काजू

१ चमचा बटर

१ कप एस.आर. थोरात गगनगिरी मलाई पनीर (किसून व घालण्यासाठी)

१/२ कप शिमला मिरची (चिरलेली)

१/२ चमचा गरम मसाला

१ चमचा कसुरी मेथी

१ चमचा पिठी साखर चवीनुसार

मीठ

पनीरचे क्यूब्स (फ्रायसाठी वेगळे)

सजावटीसाठी कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं पनीर

 

कृती :

 

एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आले, लसूण, टोमॅटो, मगज बी आणि काजू घालून परतून घ्या.

हे सर्व थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट तयार करा.

त्याच कढईत थोडं तेल गरम करून त्यात खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घालून परतून घ्या.

नंतर त्यात आधी वाटलेली पेस्ट, किसलेलं गगनगिरी मलाई पनीर आणि बटर घालून चांगलं मिक्स करा.

त्यात मीठ, कसुरी मेथी आणि पिठी साखर घालून व्यवस्थित हलवा.

एका वेगळ्या पॅनमध्ये पनीरचे क्यूब्स तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

तळलेले पनीर क्यूब्स ग्रेव्हीमध्ये घालून मिक्स करा.

शेवटी कोथिंबीर आणि किसलेलं पनीर घालून गरमागरम पनीर लवाबदार सर्व्ह करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *