आज आपण बनवणार आहोत खास पनीर अंगारा, ज्यामध्ये असेल SR थोरात यांचे मलाईदार गगनगिरी पनीर आणि खास स्मोकी फ्लेवर.

ही रेसिपी खास घरच्या पद्धतीने पण रेस्टॉरंट स्टाईल मध्ये आहे.

नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली!

 

साहित्य:

 

200 ग्रॅम SR थोरात यांचे गगनगिरी मलाई पनीर (ट्रायंगल शेपमध्ये कट केलेले)

१ टेबलस्पून SR थोरात गगनगिरी तूप

१/४ टीस्पून हळद

१ टीस्पून लाल तिखट

२ टेबलस्पून तेल

१ टीस्पून जिरे

१ मध्यम कांदा (कापलेला)

२ टेबलस्पून कांद्याची पेस्ट

१ टीस्पून आलं

१-२ हिरव्या मिरच्या (कापलेल्या)

१ टीस्पून लसूण (थोडासा)

३-४ टेबलस्पून टोमॅटो प्युरी

१ टेबलस्पून काजूची पेस्ट

१ टेबलस्पून मगज बीची पेस्ट

चवीनुसार मीठ

१/२ टीस्पून कसुरी मेथी

गरजेनुसार पाणी

१ कोळसा (स्मोक फ्लेवरसाठी)

कांद्याच्या स्लाईस

थोडं गगनगिरी तूप (धुरासाठी)

 

कृती:

 

गगनगिरी तूप गरम करून त्यात हळद व लाल तिखट टाकून पनीरचे तुकडे हलकं फ्राय करून घ्या.

कढईत तेल गरम करून जिरे टाका.

त्यात कापलेला कांदा फ्राय करा.

नंतर त्यात कांद्याची पेस्ट, आलं, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो प्युरी, काजू व मगज बीची पेस्ट टाका.

त्यात हळद, लाल तिखट, मीठ, कसुरी मेथी घालून ऑइल सुटेपर्यंत परतून घ्या.

मिश्रण घट्ट असल्यास थोडं पाणी टाका.

नंतर त्यात फ्राय केलेले पनीर घालून चांगलं मिक्स करा आणि २ मिनिटांसाठी झाकण ठेवून स्लो फ्लेमवर शिजवा.

एका कांद्याच्या स्लाईसवर गरम कोळसा ठेवा, त्यावर थोडं तूप टाका आणि लगेच झाकण ठेवून ५-१० मिनिटं ठेवा.

आपली स्मोकी फ्लेवर असलेली पनीर अंगारा रेसिपी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

कोथिंबीरने सजवा आणि गरमागरम चपाती किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *