आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि स्वादिष्ट पनीर भुर्जी, जी चपाती, ब्रेड किंवा नुसती खायलाही खूपच चविष्ट लागते.
गगनगिरी मलाई पनीर वापरून ही रेसिपी अधिक मऊ आणि स्वादिष्ट बनते.
चला तर मग, पाहूया ही सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी!
साहित्य :
गगनगिरी मलाई पनीर – २०० ग्रॅम (स्मॅश केलेले)
तेल – २ टेबलस्पून
जिरे – १ टीस्पून
कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली)
टोमॅटो – १ मध्यम (बारीक चिरलेला)
शिमला मिरची – हिरवी, पिवळी, लाल (प्रत्येकी १/४ कप बारीक चिरलेली)
हळद – १/४ टीस्पून
लाल तिखट – १/२ टीस्पून
काळी मिरी पावडर – १/४ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कोथिंबीर – सजावटीसाठी (बारीक चिरलेली)
लिंबाचा रस – १ टीस्पून
कृती :
कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालून फोडणी द्या.
त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
नंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालून चांगले मिक्स करा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा.
त्यात बारीक चिरलेली हिरवी, पिवळी व लाल शिमला मिरची घालून व्यवस्थित मिक्स करून २-३ मिनिटे परतून घ्या.
नंतर हळद, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा.
त्यात स्मॅश केलेले गगनगिरी पनीर घालून सर्व घटक चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि २-३ मिनिटे शिजवा.
शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
गरमागरम पनीर भुर्जी चपाती, ब्रेड किंवा नुसतीच सर्व्ह करा.