आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि कुरकुरीत पनीर चिली, तेही अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये!

या रेसिपीसाठी गगनगिरी मलाई पनीर वापरून, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा हे स्वादिष्ट डिश.

 

साहित्य:

 

गगनगिरी मलाई पनीर – २०० ग्रॅम

कॉर्नफ्लोअर – आवश्यकतेनुसार (पनीर कोटिंगसाठी)

तेल – तळण्यासाठी

लसूण – बारीक चिरलेले

आलं – बारीक चिरलेले

कांदा – बारीक चिरलेला

शिमला मिरची – ग्रीन, यलो, रेड (बारीक चिरलेली)

काळी मिरी पावडर – चवीनुसार

मीठ – चवीनुसार

शेझवान सॉस – २ टेबलस्पून

सोया सॉस – २ टेबलस्पून

कॉर्नफ्लोअर स्लरी – १ टेबलस्पून

कॉर्नफ्लोअर + २ टेबलस्पून

पाणी

 

कृती :

 

गगनगिरी मलाई पनीरचे स्लाइस कॉर्नफ्लोअरने कोट करा.

कोट केलेले पनीर गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

तळून झाल्यावर पनीर काढून बाजूला ठेवा.

त्याच तेलात लसूण, आलं, कांदा, आणि विविध रंगांच्या शिमला मिरच्या घालून परतून घ्या.

त्यात काळी मिरी पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.

शेझवान सॉस आणि सोया सॉस घालून चांगले मिक्स करा.

कॉर्नफ्लोअर स्लरी घालून मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवा.

तळलेले पनीर या मिश्रणात घालून सर्व काही नीट मिक्स करा.

गरमागरम पनीर चिली सर्व्ह करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *