आज बनवूया रेस्टॉरंटसारखा बटर नान!

या रेसिपीमध्ये वापरलेत SR Thorat Active Cow Milk आणि गगनगिरी दही, ज्यामुळे नान होतो अजून मऊ, फुलकेसर आणि स्वादिष्ट.

सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा हॉट बटर नान आणि सर्व्ह करा तुमच्या आवडत्या भाजीसोबत!

 

साहित्य:

 

½ कप + 1 टेबलस्पून पाणी

¼ कप SR Thorat Activ Cow Milk

½ कप गगनगिरी दही

२ टेबलस्पून पिठी साखर

१ टेबलस्पून तेल

२ कप मैदा

१ कप गव्हाचे पीठ

१ टीस्पून बेकिंग पावडर

¼ टीस्पून बेकिंग सोडा

चवीनुसार मीठ

कलोंजी आणि कोथिंबीर (टॉपिंगसाठी)

गरम बटर (लावण्यासाठी)

 

कृती:

 

एका बाउलमध्ये पाणी, SR Thorat Active Cow Milk, गगनगिरी दही, पिठी साखर आणि तेल घालून नीट मिक्स करा.

त्यात मैदा, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घालून मऊसर पीठ मळून घ्या.

पीठ झाकून १–२ तास फुलू द्या.

तयार पीठाचे छोटे उंडे करून त्याला लाटून कोथिंबीर व कलोंजी शिंका.

तव्यावर किंवा तंदुरी ऊष्मित तव्यावर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

गरम गरम बटर लावून सर्व्ह करा – तुमच्या आवडत्या भाज्या, कढी किंवा तंदुरी चिकनसोबत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *