दही भल्ले हे एक लोकप्रिय भारतीय स्ट्रीट फूड आहे, जे मऊसूत वडे, गोड आणि तिखट चटण्या, आणि मसाल्यांनी सजवलेले असते.
या रेसिपीमध्ये आपण घरच्या घरी स्ट्रीट स्टाइल दही भल्ले कसे बनवायचे ते शिकूया.
साहित्य:
उडीद डाळ – १ कप (भिजवलेली)
मूग डाळ – १/२ कप (भिजवलेली)
गगनगिरी दही – २ कप (फेटलेले)
पिठी साखर – ३ टेबलस्पून
हिंग – १/४ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – तळण्यासाठी
पाणी – आवश्यकतेनुसार
चिंचेची चटणी – आवश्यकतेनुसार
हिरवी चटणी – आवश्यकतेनुसार
बुंदी – सजावटीसाठी
चाट मसाला – चवीनुसार
लाल तिखट पावडर – चवीनुसार
कृती:
एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात हिंग आणि मीठ टाकून मिक्स करून साइडला ठेवा.
दुसऱ्या बाउलमध्ये गगनगिरी दही घेऊन त्यात ३ टेबलस्पून पिठी साखर टाकून मिक्स करा.
मिक्सर जारमध्ये भिजवलेली उडीद डाळ आणि मूग डाळ घालून बारीक पेस्ट तयार करा.
ही दोन्ही डाळींची पेस्ट एकत्र नीट मिक्स करा आणि चेक करा की ती पाण्याच्या वर फ्लोट होते आहे का नाही.
एक एक करून त्याचे वडे तळून घ्या.
वडे तळून झाल्यावर ते बनवलेल्या हिंग-मिठाच्या पाण्यात टाकून काही वेळ भिजवा आणि नंतर पूर्ण पाणी निथळून काढा.
वड्यांवर गगनगिरी दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, बुंदी, चाट मसाला आणि लाल तिखट पावडर टाकून मस्त एन्जॉय करा!