खुसखुशीत आणि खमंग शंकरपाळ्या

 

दिवाळीच्या फराळात शंकरपाळ्यांना वेगळंच महत्त्व असतं. या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलंय खुसखुशीत, खमंग आणि सोपी शंकरपाळी रेसिपी – जी बनवली आहे S.R. Thorat Active Cow Milk आणि गगनगिरी तूप वापरून.
तुमच्या दिवाळीला आणखी खास करा या घरगुती रेसिपीसोबत!

साहित्य:
1 कप S.R. Thorat Active Cow Milk (उकडलेले)
½ वाटी साखर
½ कप गगनगिरी तूप
½ किलो मैदा
चिमूटभर मीठ
½ टीस्पून इलायची पावडर

कृती:
सर्वप्रथम दूध, साखर आणि तूप एकत्र करून मिश्रण तयार करा.
हे मिश्रण मैद्यात घाला, त्यात मीठ व इलायची पावडर टाकून मऊसर डो बनवा.
डो लाटून घ्या आणि बाजू कापून चौकोनी/हव्या त्या आकारात तुकडे करा.
गरम तुपात सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत तळा.

Share:

More Posts

Send Us A Message