गोडात थोडं वेगळं आणि आरोग्यदायी हवंय?
चला, बनवूया पौष्टिक बीटरूट हलवा!
हा हलवा SR Thorat Activ Cow Milk आणि गगनगिरी तूपाच्या मदतीने बनवलेला, ज्यामुळे चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढतात.
साहित्य:
२ टेबलस्पून गगनगिरी तूप
२ मध्यम बीटरूट (किसलेले)
अर्धा लिटर SR Thorat Activ Cow Milk
२ टेबलस्पून गगनगिरी मिल्क पावडर
१/४ टीस्पून वेलची पूड
चवीनुसार साखर
२ टेबलस्पून गगनगिरी तूप
काजू व बदाम
ड्रायफ्रूट्स
कृती:
कढईत २ टेबलस्पून गगनगिरी तूप गरम करून त्यात किसलेले बीटरूट टाकून मध्यम आचेवर चांगलं परता.
आता त्यात अर्धा लिटर SR Thorat Activ Cow Milk ओता आणि मधोमध हलवून शिजू द्या.
दूध थोडं आटकल्यावर, गगनगिरी मिल्क पावडर, वेलची पूड आणि चवीनुसार साखर घालून नीट मिसळा.
एका वेगळ्या पॅनमध्ये २ टेबलस्पून गगनगिरी तूप गरम करून काजू-बदाम हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत परता.
परतलेल्या ड्रायफ्रूट्सना हलव्यात मिसळून हलवा पूर्ण करा.
सर्व्ह करताना वरून अतिरिक्त ड्रायफ्रूट्स फेकून गार्निश करा आणि गरमगरम सर्व्ह करा!