घरच्या घरी बनवा रिच, स्पायसी आणि टेस्टी वेज कोल्हापुरी – अगदी रेस्टॉरंटच्या चवीनं!
साहित्य:
गरम मसाले – थोडे (दालचिनी, लवंग, वेलदोडा)
कांदा – १ मध्यम (चिरून)
टोमॅटो – १ मध्यम
आले – १ इंच तुकडा
लसूण – 4–5 पाकळ्या
हिरवी मिरची – 1–2
कढीपत्ता – 6–7 पाने
काजू – 7–8
तेल – आवश्यकतेनुसार
शिमला मिरची – ½ कप (फ्रायसाठी)
जिरे – ½ टीस्पून
कांदा – 1 मध्यम (चिरलेला)
टोमॅटो – 1 मध्यम (चिरलेला)
लाल तिखट – 1 टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
धना पावडर – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
कस्तुरी मेथी – ½ टीस्पून
चवळी – ¼ कप
मटार – ¼ कप
गगनगिरी पनीर – ½ कप (तुकडे करून)
शॅलो फ्राय भाज्या – (गाजर, बीन्स, फ्लॉवर, इत्यादी)
पाणी – आवश्यकतेनुसार
साखर – ½ टीस्पून
बटर – 1 टीस्पून
कृती:
सर्व गरम मसाले, कांदा, टोमॅटो, आले, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि काजू एका पॅनमध्ये थोडं परतवून घ्या.
मग हे सर्व मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्या.
दुसऱ्या बाजूला, थोडं तेल गरम करून त्यात शिमला मिरची फ्राय करून बाजूला काढा.
आता त्याच पॅनमध्ये जिरे टाकून फोडणी द्या.
त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून थोडं परता.
मग त्यात लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि मीठ टाकून मिक्स करा.
आता या मिश्रणात वाटलेली पेस्ट घालून चांगलं मिक्स करा.
त्यात कस्तुरी मेथी, चवळी, मटर आणि गगनगिरी पनीर टाकून मिक्स करा.
फ्राय केलेल्या भाज्या त्यात घालून एकत्र करून घ्या.
थोडं पाणी घालून झाकण ठेवून स्टीम घ्या.
शेवटी साखर आणि बटर टाकून परत एकदा हलवा.
तयार आहे तुमचं स्पायसी आणि टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल वेज कोल्हापुरी! गरम गरम सर्व्ह करा.