चवदार शेवई खीर असेल, तर काय म्हणायचं?
आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम पारंपरिक आणि स्वादिष्ट अशी शेवई खीर – ती ही एस. आर. थोरात ॲक्टिव्ह गायीचे दूध आणि एस. आर. थोरात यांचे गगनगिरी तूप वापरून!
साहित्य :
एस. आर. थोरात ॲक्टिव्ह गायीचे दूध– ½ लिटर
एस. आर. थोरात यांचे गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून
गव्हाच्या शेवया – 1 कप
साखर – चवीनुसार
इलायची (वेलदोडा) पावडर – ½ टीस्पून (वेलदोडा ग्राइंड करून)
ड्रायफ्रूट्स – काजू, बदाम, मनुका
किसलेले सुके खोबरे – 2 टेबलस्पून
कृती :
सर्वात आधी एस. आर. थोरात ॲक्टिव्ह गायीचे दूध एका कढईत गरम करून घ्या.
दुसऱ्या भांड्यात एस. आर. थोरात गगनगिरी तूप गरम करून त्यात गव्हाच्या शेवया टाका.
मध्यम आचेवर शेवया छान ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात थोडं किसलेलं खोबरे, परतलेले ड्रायफ्रूट्स टाका आणि मिक्स करा.
वरून उकळलेलं दूध ओता आणि सगळं मिश्रण लो फ्लेमवर मिक्स करत शिजवा.
चवीनुसार साखर आणि वेलदोडा पावडर टाका.
खीर घट्ट होत आली की वर छानसा गगनगिरी तुपाचा गोल्डन लेयर तयार होईल.
शेवटी ड्रायफ्रूट्सने गार्निश करा आणि गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा