चायनीज म्हटलं की सर्वांचं फेव्हरेट, आणि त्यात जर पनीर चिली असेल तर तोंडाला पाणी आलंच म्हणून समजा!
घरच्या घरी झटपट बनवा एस. आर. थोरात गगनगिरी मलाई पनीर वापरून ही झणझणीत रेसिपी.
साहित्य :
२०० ग्रॅम गगनगिरी मलाई पनीर (क्यूब्समध्ये कापलेले)
१ टीस्पून रेड चिली पावडर
१ टीस्पून चिली फ्लेक्स
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून शेजवान चटणी
तेल (फ्रायसाठी)
१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण (गार्लिक)
२-३ ड्राय रेड चिली
½ ढोबळी मिरची (चिरलेले)
½ कांदा (स्लाइस केलेला)
१ टेबलस्पून रेड चिली सॉस
१ टेबलस्पून ग्रीन चिली सॉस
१ टीस्पून सोया सॉस
½ टीस्पून ब्लॅक पेपर पावडर
१ टेबलस्पून मैद्याची स्लरी (१ टीस्पून मैदा + २ टेबलस्पून पाणी)
फाईन चिरलेली कोबी (गार्निशसाठी)
कृती :
सर्वप्रथम पनीर क्यूब्समध्ये कट करून घ्या.
त्यात रेड चिली पावडर, चिल्ली फ्लेक्स, मीठ आणि शेजवान चटणी टाकून नीट मिक्स करा.
नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पनीर फ्राय करून घ्या आणि बाहेर काढून ठेवा.
त्याच तेलामध्ये गार्लिक, ड्राय रेड चिली, कॅप्सिकम आणि कांदा टाकून शॅलो फ्राय करा.
त्यात शेजवान चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि ब्लॅक पेपर टाका.
नंतर त्यात मैद्याची स्लरी टाकून चांगलं मिक्स करा.
आता त्यात फ्राय केलेले पनीर परत टाका आणि नीट एकत्र करा.
शेवटी फाईन चिरलेली कोबी घालून गार्निश करा आणि गरम गरम सर्व्ह करा!