चीज सँडविच हा एक झटपट आणि चविष्ट नाश्ता आहे जो अगदी कमी वेळात तयार करता येतो.
गगनगिरी बटरने रोस्ट केलेली ब्रेड, ताज्या भाज्यांची टॉपिंग आणि भरपूर चीज यामुळे हे सँडविच अगदी हटके लागते!
साहित्य:
ब्रेड स्लाइस – 2-4
गगनगिरी बटर – 1-2 चमचे
कांदा – 1 (बारीक चिरून)
शिमला मिर्ची – 1 (बारीक चिरून)
स्वीटकॉर्न सीड्स – 2 चमचे
मीठ – चवीनुसार
ब्लॅक पेपर – ½ चमचा
चिली फ्लेक्स – ½ चमचा
रेड चिली सॉस – 1 चमचा
चीज स्लाइस – 1-2
मोजरेला चीज – आवश्यकतेनुसार (वरून घालण्यासाठी)
कृती :
पॅनमध्ये गगनगिरी बटर गरम करा.
ब्रेड स्लाइसच्या दोन्ही बाजूंनी छान रोस्ट करून घ्या.
दुसऱ्या ब्रेड स्लाइसलाही तसंच रोस्ट करा.
एका बाऊलमध्ये शिमला मिर्ची, कांदा, स्वीटकॉर्न सीड्स, ब्लॅक पेपर, चिली फ्लेक्स, रेड चिली सॉस आणि मीठ मिसळून एक मिश्रण तयार करा.
एका रोस्टेड ब्रेडवर चीज स्लाइस ठेवा.
त्यावर दुसरी रोस्टेड ब्रेड ठेवून टॉपिंग पसरवा.
हे सँडविच ग्रीस केलेल्या पॅनमध्ये ठेवून वर भरपूर मोजरेला चीज टाका.
झाकण ठेवून थोडा वेळ स्टीम द्या.
गरमागरम, ताजं आणि चविष्ट चीज सँडविच तयार आहे!