तोंडाला पाणी आणणारी स्वादिष्ट पनीर सँडविच रेसिपी आता घरच्या घरी बनवा!

या सँडविचमध्ये वापरले आहे खास गगनगिरी पनीर, चीज, भाज्या आणि झणझणीत चव देणारे मसाले.

घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तयार होणारा चविष्ट ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळचा परफेक्ट स्नॅक.

 

साहित्य :

फिलिंगसाठी:

गगनगिरी पनीर (बारीक कापलेले किंवा क्यूब्समध्ये)

१ टोमॅटो (बारीक चिरलेला)

१ शिमला मिरची (बारीक चिरलेली)

१ कांदा (बारीक चिरलेला)

चीज (ग्रेट केलेले किंवा स्लाइस स्वरूपात)

१ टीस्पून शेझवान सॉस

चवीनुसार मीठ

½ टीस्पून चिल्ली फ्लेक्स

½ टीस्पून ऑरिगेनो

 

सँडविचसाठी:

ब्रेड स्लाइसेस

गगनगिरी बटर

हिरवी चटणी

मेयोनिज

थोडं चीज (वरून घालण्यासाठी)

भाजण्यासाठी थोडं गगनगिरी बटर

सॉस व हिरवी चटणी (सर्व्ह करण्यासाठी)

 

कृती :

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, गगनगिरी पनीर, चिल्ली फ्लेक्स, ऑरिगेनो, मीठ, शेझवान सॉस आणि चीज एकत्र करून नीट मिक्स करा.

ब्रेड स्लाइसेस घ्या. त्यावर गगनगिरी बटर लावा.

त्यावर थोडंसं मेयोनिज आणि हिरवी चटणी लावा.

नंतर तयार केलेलं पनीर फिलिंग ब्रेडवर पसरवा आणि त्यावर थोडं चीज टाका.

दुसरी ब्रेड स्लाइस वरून ठेवा आणि सँडविच तयार करा.

आता दोन्ही बाजूंनी गगनगिरी बटर लावून ते तव्यावर किंवा सँडविच मेकरमध्ये खरपूस भाजा.

भाजून झाल्यावर सँडविच मधून कापून त्यावर थोडं चीज टाका.

गरमागरम केचप आणि हिरवी चटणीसोबत सर्व्ह करा.

 

तयार आहे स्वादिष्ट, झणझणीत आणि चीजभरलेलं “”पनीर सँडविच””!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *