कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर खास पारंपरिक पद्धतीने तयार केलेले मसाला दूध!
या व्हिडिओमध्ये आपण वापरणार आहोत स. र. थोरात यांचे ‘शक्ती मिल्क’, केशर, वेलदोडा, बदाम, काजू आणि साखरेसह एक स्वादिष्ट आणि पौष्टिक मसाला दूध.
गडद चंद्रप्रकाशात, कुटुंबासोबत हे मसाला दूध नक्की एन्जॉय करा.
साहित्य :
शक्ती मिल्क (S. R. Thorat यांचे दूध) – १ लिटर
केशर – ८-१० काड्या
वेलदोडा पावडर – १/२ टीस्पून
बदाम (बारीक चिरलेले) – ८-१०
काजू किस – २ टेबलस्पून
बदाम आणि काजूचे काप – गार्निशसाठी
साखर – १ वाटी (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
पिस्ता (गार्निशसाठी) – थोडेसे
कृती :
शक्ती मिल्क एका भांड्यात घेऊन गॅसवर उकळा.
दूध उकळल्यानंतर त्यात केशर आणि वेलदोड्याची पावडर टाका.
हे दूध थोडंसं आटवून घ्या म्हणजे घट्टसर होईल.
आता त्यात बारीक चिरलेले बदाम आणि काजू किस टाका व नीट मिक्स करा.
वरून बदाम आणि काजूचे काप टाकून पुन्हा एकदा ढवळा.
नंतर त्यात साखर घालून पुन्हा थोडं उकळवा आणि नीट मिसळा.
गरम मसाला दूध ग्लासमध्ये ओता.
वरून पिस्त्याने गार्निश करा.

