रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी झटपट आणि पारंपरिक हवंय?
तर नक्की करून बघा ही चविष्ट वरण चकोल्या रेसिपी – गगनगिरी तुपासह!
साहित्य:
– २ वाट्या गव्हाचं पीठ
– चवीनुसार मीठ, हळद, ओवा
– गगनगिरी तूप – मुगडाळ, तूरडाळ
– आलं, लसूण, हिरवी मिरची
– जिरे, गूळ, टोमॅटो
– मोहरी, हिंग, कढीपत्ता
– लाल तिखट, कोकम
– कोथिंबीर
कृती:
एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, मीठ, हळद, ओवा, गगनगिरी तूप आणि पाणी टाकून मऊ गोळा मळून घ्या.
दुसऱ्या बाउलमध्ये मुगडाळ आणि तूर डाळ धुऊन कुकरमध्ये घाला.
त्यात जिरे, आलं, लसूण, हिरवी मिरची, मीठ, हळद, गूळ, टोमॅटो आणि गगनगिरी तूप घालून २-३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
दरम्यान, मळलेल्या पीठाचे लहान गोळे घेऊन चपात्या लाटून त्याला लांबट चौकोनी आकारात कापा.
एका कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, लसूण, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून फोडणी द्या.
त्यात हळद, लाल तिखट व मीठ घालून परतून, शिजवलेली डाळ त्यात मिसळा.
थोडं पाणी आणि कोकम घालून उकळवा.
शेवटी चकोल्या (कापलेले पीठाचे तुकडे) त्यात सोडून ५-१० मिनिटं शिजवा.
वरून गगनगिरी तूप आणि कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.
Instagram: