उपवास म्हटलं की साबुदाणा वडा हवाच! आज आपण बघणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी साबुदाणा वडा रेसिपी.
साहित्य :
२ वाट्या भिजवून भरडसर वाटलेला साबुदाणा
१ वाटी शेंगदाण्याचा कुट
१ वाटी उकडून चांगला मॅश केलेला बटाटा
२ ते ३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
१ चमचा साखर (ऐच्छिक) चवीनुसार मीठ
½ टीस्पून तिखट (ऐच्छिक) तळण्यासाठी तेल
कृती :
भिजवून भरडसर वाटलेला साबुदाणा एका मोठ्या बाउलमध्ये घ्या.
त्यात शेंगदाण्याचा कुट, मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, साखर, मीठ आणि मिरची पावडर घाला.
सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करा आणि घट्ट गोळा तयार करा.
त्याचे छोटे छोटे वडे बनवा.
कढईत तेल गरम करा आणि त्यात वडे मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
गरमागरम वडे गगनगिरी दह्यासोबत सर्व्ह करा आणि उपवासाची चविष्ट मजा घ्या!
अधिक चवदार आणि कुरकुरीत वड्यांसाठी गगनगिरी तुपात तळल्यास चव अधिक खुलून येते
Instagram:https://www.instagram.com/reel/DLvw2THhkHh/?utm_source=ig_web_button_share_sheet