ढाबा स्टाईल पनीर Amritsari आता बनवा घरच्या घरी, तेही गगनगिरीच्या स्वादिष्ट दही आणि बटरसोबत!
या झणझणीत पंजाबी डिशसाठी लागणारी संपूर्ण रेसिपी येथे दिली आहे.
साहित्य:
1 वाटी गगनगिरी दही
1 वाटी बेसन पीठ
1 चमचा लाल तिखट
1/2 चमचा हळद
1/2 चमचा गरम मसाला
1 चमचा धणे पावडर
चवीनुसार मीठ
1-2 चमचे गरम तेल
गगनगिरी बटर + थोडं तेल
1 मध्यम चिरलेला कांदा
2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
येलो, रेड आणि ग्रीन शिमला मिरची (कापलेली)
2 टोमॅटो (चिरलेले)
किसलेले पनीर
थोडी कस्तुरी मेथी
थोडी कोथिंबीर (सजावटीसाठी)
कृती :
एका बाउलमध्ये गगनगिरी दही, बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर, मीठ आणि गरम तेल टाकून चांगले मिक्स करा.
कढईत गगनगिरी बटर व थोडं तेल गरम करा.
त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि रंगीत शिमला मिरची टाकून परतून घ्या.
टोमॅटो टाकून तेही चांगले परतून घ्या.
त्यात गरम मसाला, लाल तिखट व मीठ टाकून मिक्स करा.
तयार केलेली बेसन-दही ग्रेव्ही त्यात घालून मिक्स करा.
किसलेले पनीर घालून परत मिक्स करा.
कस्तुरी मेथी टाकून मिक्स करा.
शेवटी कोथिंबीर टाकून सजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.
Instagram: