उपवासाचा अनुभव आणा, साबुदाणा खिचडीसोबत!
आज आपण बनवूया चविष्ट साबुदाणा खिचडी, जी उपवासाच्या दिवसात अत्यंत लोकप्रिय आहे.
गगनगिरी तूप, बटाटा, आणि शेंगदाण्याच्या कूटाने बनवलेली ही खिचडी अधिक चवदार आणि पौष्टिक बनते. चला, हे सोपे आणि झटपट रेसिपी तयार करूया!
साहित्य:
गगनगिरी तूप
2 हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेले बटाटा
मीठ
भिजवलेला साबुदाणा
शेंगदाण्याचा कूट
गगनगिरी दही (सर्व्ह करण्यासाठी)
कृती:
गगनगिरी तूप गरम करा आणि त्यात 2 हिरव्या मिरच्या तळून घ्या.
तूपात बारीक चिरलेले बटाटा, आणि थोडं मीठ घालून मिक्स करा.
त्याला वाफ द्या, नंतर भिजवलेला साबुदाणा त्यात टाकून नीट मिक्स करा.
पुन्हा वाफ देऊन, त्यात शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
आता साबुदाणा खिचडी गगनगिरी दह्यासोबत सर्व्ह करा आणि एन्जॉय करा!