आज आपण बनवणार आहोत एक कलरफुल, स्वादिष्ट आणि हेल्दी गोड पदार्थ – फ्रूट कस्टर्ड!

उन्हाळ्यात थंडगार आणि पौष्टिक डेसर्ट म्हणून हे परफेक्ट आहे.

 

साहित्य:

 

अर्धा लिटर दूध (एस.आर. थोरात यांचे ऍक्टिव्ह काऊ मिल्क)

थोडी इलायची पावडर

बदाम पेस्ट

साखर (चवीनुसार)

भिजवलेला साबुदाणा

केसर

कस्टर्ड पावडर

फळे: चिक्कू, द्राक्षं, केळी, आंबा, डाळिंब

सब्जा सीड्स

 

कृती:

 

एका कढईत दूध उकळा.

दूध उकळत असताना त्यात इलायची पावडर, बदाम पेस्ट, साखर, भिजवलेला साबुदाणा आणि केसर टाका.

एका छोट्या बाऊलमध्ये कस्टर्ड पावडरची slurry तयार करा.

ही स्लरी उकळत्या दुधात टाका आणि सतत ढवळा.

दूध थिक झाल्यावर गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्या.

थंड झाल्यावर त्यात फळे आणि सब्जा सीड्स घाला.

छान मिक्स करा आणि थंडगार सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *