आज आपण बनवणार आहोत रेस्टॉंटसारखी चव असलेली पनीर हैदराबादी!
गगनगिरी मलाई पनीर वापरून ही रेसिपी आणखी मऊ आणि स्वादिष्ट बनवणार आहोत.
साहित्य:
200 ग्राम गगनगिरी मलाई पनीर (स्ट्रिप्समध्ये कापलेलं)
तेल
कांदा (स्लाइस केलेला)
आले, काजू, हिरवी मिरची, पालकाची पानं, कोथिंबीर
दही
मसाले: रेड चिली पावडर, धने पावडर, हळद, गरम मसाला
मीठ (चवीनुसार)
खडे मसाले (तेल मध्ये परतून घालायचं)
कस्तुरी मेथी, चीज
कृती:
गगनगिरी मलाई पनीर स्ट्रिप्समध्ये कापून पॅनमध्ये फ्राय करा.
त्याच पॅनमध्ये कांदा, आले, काजू, हिरवी मिरची, पालकाची पानं आणि कोथिंबीर परतून घ्या.
हे मिश्रण थंड करा आणि मिक्सर जारमध्ये पेस्ट बनवा.
दहीमध्ये मसाले टाकून मिश्रण तयार करा.
पॅनमध्ये मसाले परतून पेस्ट घाला आणि दही मिश्रण टाकून उकळा.
त्यात फ्राय केलेलं पनीर टाकून, कस्तुरी मेथी, रेड चिली पावडर आणि गरम तेल टाकून मिक्स करा.
शेवटी चीजने गार्निश करा आणि गरमागरम पनीर हैदराबादी सर्व्ह करा!