जेवणात आरोग्यदायी आणि चवदार हवं असेल, तर ही पालक पनीर रेसिपी नक्की ट्राय करा!
पालक आणि पनीर यांचा स्वादिष्ट संगम, जो तुमच्या जेवणात नवा रंग भरून टाकेल.
साहित्य:
पालक – १ जुडी (स्वच्छ धुतलेली)
हिरवी मिरची – २-३
तेल – १ टेबलस्पून
जिरे – १ टीस्पून
कांदा – १ (बारीक चिरलेला)
लसूण – ५-६ पाकळ्या (बारीक चिरलेला)
हळद – १/२ टीस्पून
कस्तुरी मेथी – १ टीस्पून
धणे पूड – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार
पाणी – आवश्यकतेनुसार
गगनगिरी मलाई पनीर – २०० ग्रॅम (क्यूब्समध्ये कट केलेले)
कृती:
पालक आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट मिक्सरमध्ये तयार करा.
एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, कांदा आणि लसूण टाका.
कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात हळद, कस्तुरी मेथी, धणे पूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
थोडे पाणी घालून मसाला वाफवून घ्या. मसाल्यात तयार केलेली पालक पेस्ट घालून नीट मिक्स करा.
गगनगिरी मलाई पनीरचे क्यूब्स टाकून एक वाफ काढा.
गरमागरम पालक पनीर सर्व्ह करा.