Bread Rasmalai Recipe

खूपच क्रिमी ब्रेड रसमलाई | Bread Rasmalai Recipe | Easy & Quick Dessert | S.R. Thorat Milk
खूपच कमी वेळात घरच्या घरी बनवा खूपच क्रिमी आणि स्वादिष्ट अशी ब्रेड रसमलाई
या रेसिपीसाठी वापरले आहे S.R. Thorat Shakti Milk आणि Gagangiri Ghee, ज्यामुळे रसमलाई होते अधिकच क्रिमी आणि टेस्टी

साहित्य:
S.R. थोरात शक्ती दूध – आवश्यकतेनुसार
केसर – थोडेसे
साखर – चवीनुसार
कस्टर्ड पावडर – 1 ते 2 टेबलस्पून
पाणी – कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी
ब्रेड स्लाइस – आवश्यकतेनुसार
S.R. थोरात गगनगिरी तूप – 2 टेबलस्पून
ड्रायफ्रूट्स – काजू, बदाम, पिस्ता (गार्निशसाठी)

कृती:
एका कढईत S.R. थोरात शक्ती दूध घ्या आणि त्यात थोडे केसर घाला.
दूध उकळीला आल्यानंतर त्यात साखर घालून नीट मिक्स करा.
एका बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घ्या, त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या न राहतील असे नीट मिक्स करा.
हे कस्टर्डचे मिश्रण उकळत्या दुधात हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा.
दूध दाखवल्याप्रमाणे घट्ट आणि क्रिमी होईपर्यंत शिजवा.
आता ब्रेडचे छोटे स्लाइस करून घ्या.
एका पॅनमध्ये S.R. थोरात गगनगिरी तूप गरम करा आणि त्यात ब्रेडचे स्लाइस हलकेच रोस्ट करून घ्या.
रोस्ट केलेले ब्रेड एका बाऊलमध्ये काढा.
त्यावर तयार केलेली क्रिमी रसमलाई ओता.
वरून तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सने गार्निश करा.

Share:

More Posts

Send Us A Message