उपवासाची वेळ गोड आणि पौष्टिक बनवण्यासाठी आजच ट्राय करा रताळ्याची खीर – पारंपरिक चव, आरोग्यदायी घटक आणि घरगुती साज!
SR Thorat यांचं Activ Cow Milk आणि Gagangiri तूप वापरून ही खीर बनते अजूनच स्वादिष्ट आणि खमंग!
साहित्य:
1 लिटर SR Thorat Activ Cow Milk
2 टेबलस्पून Gagangiri तूप
1 वाटी किसलेलं रताळं
1 वाटी साखर
1 वाटी किसलेलं ओलं खोबरं
वेलची पूड
कापलेले बदाम, काजू, पिस्ता (गार्निशसाठी)
कृती:
1 लिटर दूध उकळून घ्या
रताळं किसून घ्या
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रताळं फ्राय करा
त्यात दूध घालून मिक्स करा
नंतर साखर, खोबरं, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून नीट मिक्स करा
वरून पिस्ता घालून गार्निश करा
तयार आहे स्वादिष्ट आणि पौष्टिक रताळ्याची खीर – उपवासासाठी एकदम परफेक्ट!

