Sheer Khurma Recipe

 

 

ईदच्या खास दिवशी बनवा स्वादिष्ट शीरखुर्मा
ही पारंपरिक मिठाई बनवायला अगदी सोपी आणि झटपट आहे.
गगनगिरी घी, S. R. Thorat Activ Cow Milk, काजू, बदाम, खजूर आणि बारीक शेवई यांसह बनवलेला हा शीरखुर्मा प्रत्येक घासाला खास चव देतो.

Ingredients:
गगनगिरी घी – २ चमचे
S. R. Thorat Activ Cow Milk – १ लिटर
काजू – २ चमचे (कापलेले)
बदाम – २ चमचे (कापलेले)
खजूर – ४-५ (कापलेले)
मनुके – २ चमचे
चारोळे – १ चमचा
पिस्ता – २ चमचे (कापलेले)
बारीक शेवई – १ कप
वेलची पूड – ½ चमचा
साखर – ½ कप (चवीनुसार)
केसर – १ चमचा (दुधात भिजवलेली)

Method:
पॅनमध्ये गगनगिरी घी टाका आणि त्यात काजू, बदाम, चारोळे वेगवेगळे भाजून बाजूला काढा.
त्याच घीमध्ये बारीक शेवई भाजून घ्या.
एका टोपा मध्ये S. R. Thorat Activ Cow Milk टाका आणि उकळून घ्या.
त्यात वेलची पूड, साखर आणि केसर घालून मिक्स करा.
दुधाला उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया, काजू-बदाम, खजूर, मनुके व चारोळे टाका.
नीट हलवा आणि काही मिनिटे उकळू द्या.
अशा पद्धतीने तयार होतो तुमचा ईद स्पेशल शीरखुर्मा!

Share:

More Posts

Send Us A Message