खूपच कमी वेळात बनवूया लहान मुलांचा फेव्हरेट, हेल्दी आणि खूपच टेस्टी स्ट्रॉबेरी मिल्कशेक या रेसिपीसाठी वापरलं आहे S. R. थोरात यांचे शक्ती मिल्क, फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि आईस्क्रीम, ज्यामुळे चव होते अजूनच खास.

साहित्य:
S. R. थोरात शक्ती मिल्क – 1 ग्लास
फ्रेश स्ट्रॉबेरीज – 1 वाटी (कट केलेल्या)
साखर – चवीनुसार
स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम – 2 स्कूप
स्ट्रॉबेरी सिरप – गार्निशसाठी

कृती :
स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन दाखवल्याप्रमाणे कापून घ्या.
मिक्सर जारमध्ये S. R. थोरात शक्ती मिल्क घाला.
त्यात कट केलेल्या स्ट्रॉबेरीज टाका.
आवडीनुसार साखर घाला.
स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम ऍड करा.
सर्व साहित्य व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.
एका ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी सिरप घाला.
त्यामध्ये तयार केलेला मिल्कशेक ओता.
वरून आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरीने गार्निश करा.
टेस्टी आणि हेल्दी स्ट्रॉबेरी मिल्कशेक एन्जॉय करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *